जरा पावली निजसंधी ।
3085.
जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधी व्याधीं ॥१॥
पायी पडतसें वेंगडी । अधारीं धरणे लागे काठीं ॥२॥
डोळांचि पडे तोंडा लाळ । नाका येत शेंबूड वोंगळ ॥३॥
चुंबन देता पोरांप्रती । बाऊ म्हणोनि पोरें पळती ॥४॥
ऐशी दशा येईल अंगा । एका जनार्दनी शरण रिघा ॥५॥
