जैसा गळी लागला मासा
3107.
जैसा गळी लागला मासा । तैसा फांसा यमाचा ॥१॥
जाणते परी वेडे होती । फेरे घेती चौर्यांयशी ॥२॥
परि नेघे रामनाम । सदा काम विषयाचे ॥३॥
म्हणे जनार्दनी एका । यासी सुटका कैसेनी ॥४॥