पिता पुत्र नातु सर्व
3095.
पिता पुत्र नातु सर्व काळे ग्रासिले । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥
सायास करूनि वाढविती माझे । परि काळाचे ते खाजे नेणती ते ॥२॥
बाळतरुण वृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥
एका जनार्दनी भुलला गव्हार । न करी स्वहिताचा ॥४॥
