वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अखंड संत निंदी । ऐसी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080892 · अभंग क्र. ३०९३

3093.
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी ॥१॥
काय म्हणावे तयासी । तो केवळ पापरासि ॥धृपद॥
जो स्मरे राम नामा । तयासी म्हणती रिकामा ॥२॥
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणताती भिकारी ॥३॥
तुका म्हणे विंचाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगी ॥४॥

अर्थ :
अखंड संतांची निंदा करणे हीच व अशीच दुष्टांची दुर्बुध्दी असते. अशा व्यक्तींना म्हणावे तरी काय ते केवळ पापाच्या राशीच असतात. जो रामनामाचे स्मरण करत असतो त्याला हे दुर्जन लोक म्हणतात की, हा रिकामटेकडा आहे याला काहीही काम नाही. तीर्थ व्रत करणाऱ्या लोकांना हे भिकारी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, जशी विंचवाची नांगी विषारी असते अगदी तसेच दुर्जन लोकांचे सर्वांगच विषारी असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग