वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ऐसे नाना भेष घेऊनी ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080587 · अभंग क्र. ३०७८

3078.
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगा पा साचार नांव त्याचे ॥२॥
जन्मता संसार त्यजियेला शुके । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
अशा प्रकारे पोटासाठी लोक विविध प्रकारचे वेष घेऊन दारोदारी हिंडत असतात आणि दान घेत असतात. अहो परमार्थासाठी संसाराचा त्याग कोण करणार आहे एखादयाचे तरी नांव सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात, जन्मत: संसाराचा त्याग केवळ शुकाचार्यानेच केला त्यामुळे सर्वांमध्ये तेच एक निर्दोष आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग