उपजले मनी । हे तो स्
3095.
उपजले मनी । हे तो स्वामीची करणी ॥१॥
होईल प्रसादाचे दान । तरि हे कवुतक पाहेन ॥धृपद॥
येईल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरी ॥२॥
भक्तीप्रयोजना । प्रयोजावे बंदिजना ॥३॥
यश स्वामिचिये शिरी । दास्य करावे किंकरी ॥४॥
तुका म्हणे आळी करा । त्यासी योजावे उत्तरा ॥५॥
अर्थ :
माझ्या अंत:करणामध्ये सेवा करणे हा भाव उत्पन्न झाला ही देखील माझ्या स्वामीचीच करणी आहे. जर माझा स्वामी माझ्यावर प्रसन्न होऊन मला प्रसादाचे दान देणार असेल तर मी ते कौतुकाने डोळयाने पाहीन. जर माझ्या स्वामीकडून मला अभयाचे वचन येईल तर ती आज्ञा मी शीरसावंद्य मानेन. स्वामीने आम्हा बंधूजणांना फल देण्याचे प्रयोजन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही हट्ट करणारे आहोत त्यामुळे आमचे समाधान करण्यासाठी तुम्ही आमच्याशी काहीतरी बोलण्याचे प्रयोजन करावे.
