बधिर जाले पै श्रवण ।
3086.
बधिर जाले पै श्रवण । जाले दंत उन्मळण ॥१॥
अझुनी काय धरिसी माया । गेली इंद्रियें विलया ॥२॥
नाकीं श्लेष्मांचा खाल्लोळ । तोंडावाटे पडे लाळ ॥३॥
टरपुर वाजे गुदद्वार । चरणी सांडिली व्यापार ॥४॥
वृषण आले गुडघ्यावरी । शिश्न लोंबें पीठचाचरी ॥५॥
कफवात पै सुटला । शरीर कांपे चळवळा ॥६॥
लहान थोर ते हासती । फे फे वांकुल्या दाविता ॥७॥
वागतां चांचपडे भिंती । पोरें बाऊ म्हणोनी पळती ॥८॥
भार्या केली रे आवडी । तो तुजवर बोटे मोडी ॥९॥
स्त्रीये पाहिजे पुरुषभोग । तुज लगला खोकला रोग ॥१०॥
तुज जाणे निरयाकडे । ती काजळकुंका रडे ॥११॥
प्राण आला डोळियासी । कैसी स्वार्थ न सांडिसी ॥१२॥
आंगण जाले रे विदेश । किती करिसी विषयसोस ॥१३॥
आप्त म्हणती का मरेना । पालटु जाला याचिया चिन्हा ॥१४॥
एका जनार्दनी निष्काम । भजा भजा रे परब्रह्मा ॥१५॥
