वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

लांबवूनि जटा नेसोनि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080828 · अभंग क्र. ३०७२

3072.
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळता वर्म मिथ्यावाद ॥३॥

अर्थ :
असे कित्येक तरी लोक आहेत की ते लांब लांब जटा वाढवतात लंगोटी नेसतात आणि मोठा अभिमान त्याविषयी करतात. सर्वांगाला राख लावतात आणि मिष्ठान्न भक्षण करण्यास कसे मिळेल याची वाट ते पाहातात. तुकाराम महाराज म्हणतात, खरे तर हा त्यांचा स्वधर्म नाही परंतू स्वधर्माचे वर्मच त्यांना न समजल्यामुळे ते मिथ्या वादात व आचरणात पडतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग