संसार - अभंग ३०८३ ते
3083.
संसार - अभंग ३०८३ ते ३१७७
थोर गर्भीची यातना । आठवितां दुःख मना ॥१॥
नऊमास वैरी । पचे विष्ठेचें दाथरी ॥२॥
जन्म होतांचि जननी । सुख मानी अनुदिनी ॥३॥
बाळ वाढतसे सायासें । तो तो माउली संतोषे ॥४॥
तारूण्याच्या येता भरा । मातेसी करी पाण उतारा ॥५॥
पावला सवे म्हातारपण । नाकीं तोंडीं लाळ जाण ॥६॥
नाठवेचि राम राम । एका जनार्दनी तो अधम ॥७॥
