दाढी डोई मुंडी मुंडु
3075.
दाढी डोई मुंडी मुंडुनिया सर्व । पाघुरति बरवे वस्त्र काळे ॥१॥
उफराटी काठी घेऊनिया हाती । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥
चाळवुनी रांडा देउनिया भेष । तुका म्हणे त्यास यमदंडी ॥३॥
अर्थ :
काही लोक दाढी डोके सर्व मुंडन करुन अंगावर काळी वस्त्रे परिधान करतात. उरफाटी काठी हातात घेऊन सर्वांना नास्तिकपणाचा उपदेश करतात. तुकाराम महाराम म्हणतात, अशा प्रकारे हे लोक रांडा पोरांना आपला उपदेश करतात व त्यांनाही आपल्यासारखे करुन त्यांची फसवणूक करतात त्यामुळे यम त्या लोकांना पुढे शिक्षा देतो.
