कल्पनेचे जळीं वासना
3076.
कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥
तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥
दुःखाचे डोंगर भोगिती बापुडी । कोण काढाकाढी करील त्यांची ॥३॥
एका जनार्दनी संतावांचूनिया । त्या अभाग्याची दया कोण करी ॥४॥
