जन्ममरणांची कायसी चि
3112.
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागता पंढरीराया ॥१॥
वदनी तुझे नाम अमृतसंजीवनी । असता चक्रपाणी भय काय ॥धृपद॥
हृदयी तुझे रूप बिंबले साकार । तेथे कोण पार संसाराचा ॥२॥
तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असता कळिकाळ पाया तळी ॥३॥
अर्थ :
हे पंढरीरराया तुला शरण आलेल्यांना जन्ममरणाची कसली चिंता ? हे चक्रपाणी मुखामध्ये तुझे अमृत संजीवनीसारखे नाम असताना कसले भय आले ? हे देवा तुमचे सगुण साकार रुप ह्दयामध्ये जर ठसलेले असेल तर मग संसार समुद्र तरुन जाणे काही कठीण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामाची कृपा छाया जर आमच्यावर असेल तर मग कळीकाळा देखील आम्ही आमच्या पायाखाली आणू.
