वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कौडीकौडीसाठी फोडितात

🙏 3. संत तुकाराम · ABH-080843 · अभंग क्र. ३०७४

3074.
कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥
पाघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळे ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म । न कळेचि वर्म गोविंदाचे ॥३॥

अर्थ :
कवडी कवडीसाठी काही मलंग लोक स्वत:चे डोके फोडून त्यातून रक्त काढतात. स्वत:च्या शरीरावर चर्म म्हणजे कातडे पाघरतात हातात साखळी धरतात आणि धैर्‍याने बळाने मोठयाने आरोळया मारतात. तुकाराम महाराज म्हणतात, शरीराला कष्ट देणे हा त्याचा स्वधर्म नाही त्याला गोविंदाचे खरे वर्मच समजले नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग