वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

स्त्रिया पुत्र कलत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-080496 · अभंग क्र. ३०७९

3079.
स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत । शेवटींचा अंत नाही कोणी ॥१॥
यमाचिये हाती बांधोनिया देती । भूषणे ही घेती काढूनिया ॥२॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
स्त्री पुत्र कलत्र हे सर्व मायेच्या आधीन आहेत आपल्या शेवटी म्हणजे अंत:काळी यापैकी कोणीही उपयोगी पडणार नाही. आपण मेलो की आपल्याला यमाच्या हातात ते बांधून देतात आणि आपल्या अंगावरची जेवढी भूषणे आहेत ती सर्व काढून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे अशा या चोरांचा विश्वास तो काय, त्यामुळे तर मी तुझी कास धरली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग