वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

जाळे घातले सागरी । ब

🙏 3. संत तुकाराम · ABH-080836 · अभंग क्र. ३१०१

3101.
जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृपद॥
गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥
प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी ॥४॥

अर्थ :
समुद्रामध्ये जाळे घातले आणि ते वर काढले तर त्यामध्ये (जाळया मध्ये) बिंदू म्हणजे एक थेंब देखील पाणी राहात नाही. त्याप्रमाणेच पाप्याची म्हणजे पापी माणसाचे मन आहे त्यांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्यांच्या मनामध्ये चांगला उपदेश राहात नाही आणि त्यांना हरीकथा तर कधीच आवडत नाही. गाढवाला गंगेजवळ नेऊन गंगेच्या पाण्याने जरी आंघोळ घातली तरी ते उकिरडयावर जाऊनच लोळते. कावळयाला कितीही प्रेमाने पोसले कितीही मिष्टान्न खाण्यास दिले तरी ते शेवटी विष्टेवरच जाऊन लोळते. तुकाराम महाराज म्हणतात, अहो हरी खेकडयाला ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध केव्हाही आवडतच नाही त्याप्रमाणे पापी मनुष्याला हरीकथा व किर्तन कधीही आवडत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग