कठिण नारळाचे अंग । ब
3103.
कठिण नारळाचे अंग । बाहेरी भीतरीचे चांग ॥१॥
तैसा करी का विचार । शुद्ध कारण अंतर ॥धृपद॥
वरी काटे फणसफळा । माजि अंतरी जिव्हाळा ॥२॥
मिठे रुचविले अन्न । नये सतंत कारण ॥३॥
ऊंस बाहेरी दिसे काळा । आत रसाचा आगळा ॥४॥
तुका म्हणे मोल गोडी । काय चाड वरील्या खोडी ॥५॥
अर्थ :
नारळाचे बाहेरचे अंग हे अतिशय कठीण असते परंतू आतमधे ते खाण्यास खूप चांगले असते. या उदाहरणावरुन तुम्ही हे लक्षात घ्या की, मनुष्य बाहेरुन कसाही असला तरी चालेल परंतू त्याचे अंत:करण शुध्दच असले पाहिजे. फणस फळाला वरवर खूप काटे असतात परंतू आतमधून ते खूप गोड असते. मीठ अन्नाला चव आणते परंतू मीठेवाचून अन्न स्वतंत्र असेल तर त्याची चव लागत नाही. ऊस बाहेरुन काळा दिसतो परंतू त्याच्या आतमधे खूप चविष्ट रस असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अंत:करणातील गोडी महत्वाची आहे वरील खोडीशी आपल्याला काय कर्तव्य आहे.
