वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

होउनी जंगम विभूती ला

🙏 3. संत तुकाराम · ABH-080692 · अभंग क्र. ३०७६

3076.
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरी ॥१॥
शिवाचे निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठी ॥धृपद॥
तुका म्हणे त्यासी नाही शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥२॥

अर्थ :
काही लोक जंगम होऊन विभूती लावतात आणि घरोघरी जाऊन शंख वाजवतात. परंतू शिवाचे निर्माल्य आणि तीर्थाचे सेवन मात्र हे लोक करत नाहीत. पोटासाठी मात्र घंटा वाजवून भिक्षा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ढोंगी मनुष्याला शिव भक्तीविषयी श्रध्दा मुळीच नसते केवळ संसाराचा व्यापार चालवण्याकरता अशा प्रकारचे ढोंग हे लोक करत असतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग