श्वानाचा तो धर्म करा
3063.
श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांही ॥१॥
वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळे कांही ॥२॥
निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्यागावी न कळे कांही ॥३॥
सज्जानांचा धर्म सर्वाभुतीं दया । भेदाभेद तया न कळे कांही ॥४॥
संतांचा तो धर्म अंतरी ती शांती । एका जनार्दनी वस्ती सर्वांठायीं ॥५॥
