लावूनिया मुद्रा बांध
3077.
लावूनिया मुद्रा बांधोनिया कंठी । हिंडे पोटासाठी देशोदेशी ॥१॥
नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण । पाहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते ॥धृपद॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥२॥
अर्थ :
काही लोक संपूर्ण शरीराला विविध प्रकारच्या मुद्रा लावून कंठामध्ये तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळा घालून पोटासाठी देशोदेशी हिंडत असतात. असे हे ढोंगी लोक अंगामध्ये कोपीन घालून शुभ्र वस्त्र अंगावर पाघरतात आणि आज पक्वानाचा बेत कोठे आहे हे पाहात ते क्षेत्रस्थ फिरत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे मैंद लोक आहेत त्यांच्याजवळ गोविंद कधीही राहात नाही.
