चंदनाचे झाडा भुजंग व
3064.
चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ ॥१॥
कमळणीं पुष्पी भ्रमर गुंतला । प्राणी वोथंबला तयापरी ॥२॥
मंजुळ गायनी । कुरंग वेधला प्राणी तो गुंतला तैशापरी ॥३॥
मोहळ कंदासी मक्षिका गुंतली । तैशी परी जाहली प्राणियासी ॥४॥
एका जनार्दनी गुंतू नको वाया । जासी भोगावया सुख दुःख ॥५॥
