वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नमो नमो तुज माझे हे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080923 · अभंग क्र. ३०७०

3070.
नमो नमो तुज माझे हे कारणे । काय झाले उणे करिता स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतो झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥धृपद॥
न करिसी तरि हेचि कोडे मज । भक्ती गोड काज आणीक नाही ॥२॥
करी सेवा कथा नाचेन रंगणी । प्रेमसुखधणी पुरेल तो ॥३॥
महाद्वारी सुख वैष्णवांचे मेळी । वैकुंठ जवळी वसे तेथे ॥४॥
तुका म्हणे नाही मुक्तिसवे चाड । हेचि जन्म गोड घेता मज ॥५॥

अर्थ :
देवा मी तुला वारंवार नमस्कार करत आहे व एक निवेदन मी करत आहे, रोज जर स्नान केले तर काही बिघडेल काय त्यामुळे मी रोज स्नान करत जाणार आहे संत ज्या मार्गाने चालत आहे त्या मार्गाने मी पुढे झाडत चालत राहीन व त्यांच्या मागेही मी चालत राहीन मग मला तेथे लाभ होवो अथवा हानी होवो तरी काही हरकत नाही. देवा तू माझे लाड कोड कौतुक केले नाही तरी मला भक्तीच गोड वाटते आणि भक्तीशिवाय मला कशाशीही कर्तव्य नाही. देवा मी तुझी कथा तुझी सेवा करेन व आनंदाने तुझ्यापुढे नाचेन आणि तृप्ती होईपर्यंत तुझे प्रेमसुख घेत राहीन. महाव्दारात तसेच वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये खूप सुख आहे आणि वैकुंठ देखील त्यांच्या जवळच वसलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला सायुज्यमुक्तीची आवडच नाही मला देवाची भक्तीच फार गोड वाटते आणि त्या भक्तीसाठीच मला हा जन्म घेणे देखील गोड वाटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग