वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

घेता आणिकाचा जीव । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-080683 · अभंग क्र. ३१०८

3108.
घेता आणिकाचा जीव । तेव्हा कीव कराना ॥१॥
आपले ते वरदळ नेदा । हे गोविंदा कृपणता ॥धृपद॥
सेवा तरी इच्छा सांग । चोरिले अंग साहेना ॥२॥
तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही इतरांकडून सेवा करुन करुन त्यांचा फार जीव घेता मग त्यांच्यावर थोडी तरी दया करीत जावा. हे गोविंदा अहो तुम्ही तर भक्तांसाठी तुमच्या अंगाला थोडा देखील धक्का लागू देत नाही इतकी तर तुमच्या अंगी कृपणता आहे. अहो आमच्याकडून हवी तशी तुम्ही सेवा करुन घेता आम्ही थोडा जरी अंगचोरपणा केला तर तो तुम्हाला सहनही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे माझ्या धन्या विठोबा तू इतका निर्दयी आमच्याविषयी का झाला आहेस ते मला समजले आहे कारण तुला कोणत्याही प्रकारचे संतान नाही तुला मागे व पुढे असे कोणीही नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग