तुझे अंगभूत । आम्ही
3088.
तुझे अंगभूत । आम्ही जाणतो समस्त ॥१॥
येरा वाटतसे जना । गुढारसे नारायणा ॥धृपद॥
ठावा थारा मारा । घरचीया संव चोरा ॥२॥
तुका म्हणे भेदा भेद । करुनि करितसे वाद ॥३॥
अर्थ :
देवा सर्व तुझेच अंगीभूत आहेत हे आम्ही जाणतो. परंतू हे नारायणा इतर लोकांना हे तूझा रस फार गूढ आहे असे वाटते. जसा एखादा चोर आपल्या घरामध्ये नेहमी वावरतो परंतू आपल्याला तो चोरच आहे हे माहित नसते परंतू तो जर चोरी करण्यास आपल्या घरामध्ये आला तर त्याला कोठे लपावा कशाचा आधार घ्यावा कोठे मारा करावा हे सर्व माहित असते त्याप्रमाणे देवा आम्ही तुझ्याजवळच आहोत व तुझे सर्व रहस्य आम्हाला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्व भेदाभेद बाजूला ठेवून मी तुझ्याशी असा हा संवाद करत आहे.
