वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

इच्छेपाशी आलो फिरोनि

🙏 3. संत तुकाराम · ABH-077349 · अभंग क्र. २७५९

2759.
इच्छेपाशी आलो फिरोनि मागुता । स्वामी सेवकता आवडीचे ॥१॥
द्यावे लवकरी मागितले दान । मुळींचे जतन करूनि असे ॥धृपद॥
उपाय हे करी एकाचि वचना । दावूनिया खुणा ठाया येतो ॥२॥
तुका म्हणे गाठी किती तुजपाशी । जगाच्या तोडिसी चिंतनाने ॥३॥

अर्थ :
देवा मला कसलीही इच्छा राहिली नाही असे मी म्हणलो परंतू मला स्वामी आणि सेवक ही आवड आहे व मी परत फिरुन त्याच्याजवळच आलो आहे. त्यामुळे हे देवा मी जे तुम्हाला स्वामी सेवकाचे दान मागितले आहे ते मला लवकर दया मूळीचे जे अव्दैत आहे ते तर मी जतनच करुन ठेवले आहे. भक्त जे मागेल ते मी भक्ताला देत असतो हे तुमचेच वचन आहे आणि तुम्ही दिलेल्या खुणा याचा आधार घेऊनच मी तुमच्याजवळ येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही नाम चिंतनाच्या व्दारा जगाच्या सर्व संशयरुपी गाठी तोडून टाकता येतात परंतू तुमच्याजवळच कितीतरी गाठी आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग