भूमीभर वाया । का रे
2742.
भूमीभर वाया । का रे जन्मली ही काया ॥१॥
न घडे वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥
न घडे करे दानधर्म । कर नोहेती सर्प जाण ॥३॥
पायी तीर्थयात्रा न घडे । पाय नोहेते ते केवळ लाकडें ॥४॥
एका जनार्दनी ते वेडे । नरदेहीं प्रत्यक्ष रेडे ॥५॥
