चाले दंडवत घाली नारा
2735.
चाले दंडवत घाली नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनिया ॥१॥
बैसविला पदी पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरी आज्ञा त्याची ॥२॥
तुका म्हणे आहे ठायीचाचि मान । आता अनुमान कायसा तो ॥३॥
अर्थ :
हे नारायणा तू आता माझ्याबरोबर चल आणि तुझे कल्याणकरीता तुझ्या भक्तांना दंडवत नमस्कार घाल. देवा एकदा की राजाने आपल्या पुत्राला राजगादीवर बसवले की त्या पुत्राची आज्ञा देखील पिता शिरसावंद्य मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे मानसन्मान देणे हे पूर्वीपासूनच चालत आले आहे आता वेगळा अनुमान का करतो आहेस ?
