नित्य हाटपाय आचार सप
2720.
नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा ॥१॥
कैंचे सोवळें कैंचे ओवळे । प्रातःकाळी शिळें भक्षिताती ॥२॥
कैंचे चोखटपण अंतरी मळीन । दिसे कळाहीन पापिष्ठ तो ॥३॥
एका जनार्दनी अवघा अनाचार । दाविती आचार वरीवरी ॥४॥