वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

घालूनिया कास । बळे आ

🙏 3. संत तुकाराम · ABH-077417 · अभंग क्र. २७४४

2744.
घालूनिया कास । बळे आलो मागायास ॥१॥
प्रेमे देई पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥धृपद॥
होई रे शाहाणा । कळो नेदावे या जना ॥२॥
तुका म्हणे पायी । जडलो मग उरले काई ॥३॥

अर्थ :
देवा मी माझे सेवारुपी कर्ज तुमच्याकडेच दिले होते त्याचा मोबदला मागण्यासाठी तुमच्याकडे सर्व ताकद पणाला लावून कंबर कसून आलो आहे. हे पाडूरंगा तू सेवाऋणी आहेस आमच्या सेवेचे तुझ्यावर ऋण आहे त्यामुळे त्याच्या मोबदल्यात आम्हाला तुझे प्रेम पाठवून दयावे. देवा तू लवकर शहाणा हो तू माझा ऋणी आहेस हे लोकांना कळू देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला कर्ज देऊन देखील मी तुझ्या पायाशी जणू राहिलो आहे आता यापेक्षा मग अजून काय करायचे राहिले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग