भजन या नासिले हेंडि
2714.
भजन या नासिले हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥
जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥धृपद॥
एकाएकी इच्छी पाठ । नेणे चाट काउळे ॥२॥
तुका म्हणे मुलाम्याचे । बंधन साचे सेवटी ॥३॥
अर्थ :
लबाड लोकांनी दंभाची आवड धरुन भजन जरी केले तरी त्या नीच लोकांनी केलेले भजन नासते. जो मनुष्य आयता झालेला स्वयंपाक सेवन करत नाही कारण ते परान्न आहे त्यामुळे मी ते सेवन करणार नाही असे नाटक करतो आणि केवळ ताक घुसळवून पितो असा मनुष्य नीच आहे. जो मनुष्य आपला कोणताही अधिकार नसताना एकाएकी आपल्याला मान मिळावा सन्मान मिळावा अशी इच्छा बाळगतो तो मनुष्य देखील नीच असून मूर्ख कावळयासारखेच त्याचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य केवळ परमार्थाचा मुलामा लावून केवळ परमार्थाचे सोंग आणतो त्याला शेवटी यमाचेच वंदन मिळत असते.
