वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जेथे माझी दृष्टि राह

🙏 3. संत तुकाराम · ABH-076959 · अभंग क्र. २७५८

2758.
जेथे माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेचि हे मन गुंडाळते ॥१॥
टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविले अन्न ओकविते ॥धृपद॥
तुम्हासी का कोडे कोणी ये विशीचे । नवलाव याचे वाटतसे ॥२॥
तुका म्हणे वेगी उभारा जी कर । कीर्ती मुखे थोर गर्जईन ॥३॥

अर्थ :
देवा जिथे माझी दृष्टी दृढ झाली आहे तिथेच माझे मन घोटाळत आहे. त्यामुळे हे देवा माझी दृष्टी ज्या गोष्टीवर पडली आहे ती गोष्ट मला देऊन टाक आणि आपली पीडा तू नाहीसी कर कारण दृष्टावलेले अन्न जर खाल्ले तर ते आपल्याला ओकायला भाग पाडते. देवा तू मला काही मागितले तर त्याचे संकट तुम्हाला पडते या गोष्टीचे मला नवल वाटते कारण तुम्ही समर्थ आहात तरी देखील तुम्हाला संकट पडते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ज्याला जे हवे असेल त्याला ते देण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही कर वेगाने उभारा असे केले तर तुमची थोर किर्ती मी सर्वत्र गर्जून सांगेन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग