माझे विषयी तुज पडतो
2741.
माझे विषयी तुज पडतो विसर । नको धरू दूर पांडुरंगा ॥१॥
तुझा म्हणवितो हेचि लाज तुला । आता झणी मला विसरेसी ॥२॥
तुका म्हणे तुझी माझी नाही उरी । आता केली खरी देवराया ॥३॥
अर्थ :
हे पाडूरंगा माझ्याविषयी तुला सारखा विसर पडत आहे असे मला तू तुझ्यापासून दूर धरु नकोस. अरे मी स्वत:ला तुझा दास म्हणून घेतो याची तरी तू थोडीसी लाज धर यामागे विसरलास हे ठीक परंतू यापुढे मला विसरु नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवराया आता तुझ्यात आणि माझ्यात जर अंतरच तू उरु दिले नाहीस तर हेच खरे कृपा केल्यासारखे होईल.
