अभक्ता दुर्जना यमदुत
2737.
अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥
नाम नाही मुखी दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥
ताम्र भूमीवरी खैराचे इंगळ । लाविताती ज्वाळ अंगालागीं ॥३॥
एका जनार्दनी यातनेचें दुःख । कोणा सांगेल मूर्ख यमलोकीं ॥४॥
