वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

सकळ दोषा मुगुटमणी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086950 · अभंग क्र. २७२३

2723.
सकळ दोषा मुगुटमणी । निंदी जनी संता तो ॥१॥
जन्मतांची नाही मेला । व्यर्थ वांचला भूभार ॥२॥
त्याचियानें दुःखी धरा । नाही थारा जन्मोजन्मी ॥३॥
दांत खाय यमधर्म । देखोनिया त्याचे कर्म ॥४॥
अभागी तो वसे जनी । एका शरण जनार्दनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग