वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सांडियेली काया । वरी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077177 · अभंग क्र. २७४७

2747.
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पाया ॥१॥
शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥धृपद॥
आलो लोटांगणी । रुळे तुमचे चरणी ॥२॥
तुका म्हणे शीर । ठेवियेले पायावर ॥३॥

अर्थ :
हे देवा मी माझे शरीर तुझ्या पायावरुन ओवाळून टाकले आहे. हे नारायणा मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्हाला शरण आलो आहे माझ्यासारख्या दीनाचा तुम्ही अंगीकार करा. देवा मी लोटांगण घालीत तुमच्या चरणाजवळ आलो आहे आणि तुमच्या चरणाजवळच आता रुळलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी माझे शीर तुमच्या पायावर ठेवले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग