पाठवाल तेथे गर्जेन प
2752.
पाठवाल तेथे गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकी ॥१॥
म्हणउनि मागे कंठींचा सौरस । पावतील नास विघ्ने पुढे ॥धृपद॥
कृपेच्या कटाक्षे न भिये कळिकाळा । येता येत बळाशक्तीपुढे ॥२॥
तुका म्हणे गुढी आणीन पायापे । होईल ते सोपे नाम तुझे ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही जेथे पाठवाल तेथे मी तुमच्या किर्तीचे पोवाडे गर्जून सांगेन देहाकडे लक्ष देखील देणार नाही. पुढे येणा-या विघ्नांचा नाश व्हावा म्हणूनच मी कंठामध्ये तुमच्या नामरसाची कृपा मागत आहे. देवा तुम्ही आमच्यावर कृपा कटाक्ष जरी टाकले तरी मी कळीकाळाला भिणार नाही कारण तुमच्या शक्तीबळापुढे त्या कळी काळाचे काय चालणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामाची तुझ्या किर्तीची गुढी मी सर्वत्र वर्णन करील आणि शेवटी परत तुझ्या पायाजवळच आणीन त्यामुळे तुझे नाम घेणे अधिक सोपे होईन.
