वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

हेचि सर्वमुख जपावा व

🙏 3. संत तुकाराम · ABH-077096 · अभंग क्र. २७४०

2740.
हेचि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वाया ॥१॥
हेचि एक सर्वसाधनांचे मूळ । आतुडे गोपाळ येणे पंथे ॥धृपद॥
न लगती काही तपाचिया रासी । करणे वाराणसी नाना तीर्थे ॥२॥
कल्पना हे तिळ देही अभिमान । नये नारायण जवळी त्याच्या ॥३॥
तुका म्हणे नामे देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होटी कुष्ट होय ॥४॥

अर्थ :
विठ्ठलाचा मंत्रजप करणे हेच सर्व सुख आहे विठ्ठलाच्या नामस्मरणावाचून एकक्षण एक पळ देखील वाया घालवू नये. हेच एक सर्व साधनांचे मूळ आहे या मार्गाने चालल्यानंतर गोपाळ आपल्याला प्राप्त होत असतो. हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी केवळ विठ्ठलाच्या नामाचा जप करत राहावा त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तपाच्या राशी किंवा विविध प्रकारची तीर्थे वाराणसी करण्याची आवश्यकता नाही. विविध प्रकारच्या कल्पना आणि देहामध्ये अभिमान हे तीळभर जरी असले तरी नारायण त्याच्याजवळ येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे आपल्या ओठाने असे म्हणतील की विठोबाचे नामस्मरण केल्याने देव भेटत नाही त्याच्या ओठाला कुष्ठरोग होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग