लडिवाळ म्हणोनी निष्ठ
2733.
लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥
बहु वागवीत आणिले दुरूनि । दिसांची पोसनी बहु आहे ॥धृपद॥
नाही लागो दिला आघाताचा वारा । निष्ठुर उत्तरा कोमेजना ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी । शांतवी उत्तरी अमृताच्या ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही तुमचे लडिवाळ आहोत म्हणून तुम्ही आमच्याशी निष्ठूर बोलू नका उलट तुम्ही आमचा आघातापासून सांभाळ करा. देवा तुम्ही खूप योनीपासून खूप दुरुन आम्हाला तुम्ही वागवित आणले आहे खूप दिवसांपासून तुम्ही आमचे पोषण करीत आहात. देवा आजपर्यंत तुम्ही आम्हाला आघाताचा वारा देखील लागू दिला नाही परंतू आता तुम्ही आमच्याशी असे निष्ठूरतेने बोलता त्यामुळे आमचे मन कोमेजते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपावंत हरी तुम्ही तुमचे अमृतासारखे वचन माझ्याशी बोलून माझे मन शांत करा.
