अभागियां नावडे वैष्ण
2759.
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥
ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥
जन्मोनी मरती पुन्हा जन्मा येती । होतसे फजिती मागे पुढे ॥३॥
एका जनार्दनी नरकाचे बिढार । यमाचे ते घर माहेर केले ॥४॥
