शिकविले नाईके वचन ।
2730.
शिकविले नाईके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥
न देखे आपुले गुणदोष । पारावियाचे बोले निःशेष ॥२॥
न करावे ते करी । न बोलावें ते बोले निर्धारी ॥३॥
न मानी स्वयातीचा आचार । सदा करी अनाचार ॥४॥
शिकविले गेले वाया । शरण एका जनार्दनी पाया ॥५॥
