वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

समर्थाचे बाळ पाघरे व

🙏 3. संत तुकाराम · ABH-077278 · अभंग क्र. २७३६

2736.
समर्थाचे बाळ पाघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥
समर्थासी लाज आपुल्या नावाची । शरण आलियाची लागे चिंता ॥२॥
जरी तुज काही होईल उचित । तरी हा पतित तारी तुका ॥३॥

अर्थ :
समर्थ माणसाचे बाळ जर वाकळे पाघरु लागले तर लोक कोणाला हसतील ? समर्थाला आपल्या नावाला कोणत्याही प्रकारचा डाग लागू नये याविषयी लाज धरावी लागते आणि त्याला शरण आलेल्या व्यक्तीची चिंता देखील व्हावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्याप्रमाणे तुम्ही सर्व समर्थ आहात आणि आम्ही तुमचे बाळ आहोत लेकरे आहोत जर तुम्हाला उचित वाटत असेल तर माझ्या सारख्या पतिताला तुम्ही कृपा करुन तारा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग