भजन ते साचे भोळ्या भ
2711.
भजन ते साचे भोळ्या भाविकासी । पै अभाविकासी नरकवास ॥१॥
भोळियाचा देव अंकित भोळा । अभाविका चांडाळा जवळीं नसे ॥२॥
एका जनार्दनी भावाचें कारण । अभाविका जाण दुःख पीडा ॥३॥
२७१२ .
गजाचे ते वोझे गाढवासी न साजे । 2712
गजाचें ते वोझे गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥
पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥
एका जनार्दनी कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतो कदा न लाजे ॥३॥
