वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नारायण ऐसा । सेवू ने

🙏 3. संत तुकाराम · ABH-076976 · अभंग क्र. २७११

2711.
नारायण ऐसा । सेवू नेणतील रसा ॥१॥
जेणे भवव्याध तुटे । दुःख मागुते न भेटे ॥धृपद॥
न लगे काही आटी । बाधा राहो न सके पोटी ॥२॥
कैवल्य ते जोडे । कृपा लवकरी घडे ॥३॥
जन्ममरणदुःख आटे । जाळे अवघेचि तुटे ॥४॥
तुका म्हणे झाला । याचा गुण बहुतांला ॥५॥

अर्थ :
नारायण नामरसासारखे उत्तम रस सेवन करावे हे कोणीही जाणत नाही. ज्या नारायणाच्या नामरसाने भवव्याधी तुटते आणि आपल्याला दु:ख भेटत नाही. या नामरसाने कोणत्याही प्रकारची विकाराची बाधा आपल्या पोटात राहू शकत नाही व हे प्राप्त करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची आटाआटी करावी लागत नाही. या औषधाने कैवल्याची प्राप्ती होते व देवाची कृपाही लवकर घडते. या औषधाने जन्ममरणाचे दु:ख आटूनच जाते आणि सर्व प्रकारचे जाळे तुटून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायण नामरस औषधाने खूप जणांना गुण आला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग