वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

साता पाचा तरी वचना स

🙏 3. संत तुकाराम · ABH-076988 · अभंग क्र. २७२२

2722.
साता पाचा तरी वचना सेवटी । निरोप का भेटी एक तरी ॥१॥
का नेणे निष्ठुर केले नारायणा । न देखे हे मना येता काही ॥२॥
तुका म्हणे ऐसा न देखे निवाड । कडू किंवा गोड फळ पोटी ॥३॥

अर्थ :
देवा मी तुम्हाला पाच सात वेळा हाक मारली मला भेटीचे तर सोडून दया निदान तुम्ही मला थोड्यावेळ थांब नंतर भेटतो असा निरोप तरी पाठवायचा होता. हे नारायणा तुम्ही माझ्याविषयी तुमच्या मनात इतका निष्ठूरपणा का केला आहे आणि मला तुम्ही भेट का देत नाही हे काही मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा निवाडा करण्याविषयी तुमच्या मनामध्ये कडू फळ आहे की गोड फळ आहे हे मला काही कळत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग