राहुनी पंढरी । आणिका
2754.
राहुनी पंढरी । आणिकाची आस करी ॥१॥
तो पातकी चांदाळ । खळाहुनी अमंगळ ॥२॥
सांडोनिया विठ्ठल देव । आणिकासी म्हणे देव ॥३॥
साडोनिया पुंडलिका । गाय आणिकासी देखा ॥४॥
ऐसा पातकी तो खळक । तयाचा न वहावा विटाळ ॥५॥
म्हणे जनार्दनाचा एका । तया तेथे ठेवूं नका ॥६॥
