ऐसे कोण पाप बळी । जे
2725.
ऐसे कोण पाप बळी । जे जवळी येऊ नेदी ॥१॥
तुम्हा तव होईल ठावे । नेदावे का कळो हे ॥धृपद॥
कोण झाला अंतराय । का ते पाय अंतरले ॥२॥
तुका म्हणे निमित्याचा । आला सुचा अनुभव ॥३॥
अर्थ :
असे कोणते बलवंत पाप आहे की जे मला देवा तुमच्याजवळ येऊ देत नाही ? देवा तुम्हाला तर ते माहीतच आहे परंतू मला ते तुम्ही का कळू देत नाही ? देवा तुमच्यात व माझ्यात एवढे अंतर का निर्माण झाले तुमचे पाय माझ्यापासून एवढे का अंतरले आहेत ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्यात काय चूक होत आहे याचा अनुभव जर तुम्हाला आला तर तो मला सूचवा.
