वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नव्हे मी आहाच आशेचे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077150 · अभंग क्र. २७५४

2754.
नव्हे मी आहाच आशेचे बांधले । जे हे टोंकविले नारायणा ॥१॥
अंतर तो तुम्हा बरे कळो येते । वेव्हार उचिते चाळवीजे ॥धृपद॥
मने कल्पीले आवरीता पाप । संकल्पी विकल्प याचि नावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥

अर्थ :
हे नारायणा मी कोणत्याही इच्छेने किंवा आशेने बांधलेला गेलो नाही तरीही तुम्ही मला इतकी वाट पाहायला लावली. देवा तुम्हाला खरे आणि खोटे भक्त या दोघामधील अंतर म्हणजे भेद चांगलाच कळून येतो तरी देखील तुम्ही ख-या भक्ताला देखील व्यवहार करताना फसवता हे योग्य नाही. मनाने काहीतरी पुण्यकर्म करण्याचा संकल्प केला आणि तो जर आवरला तर यालाच संकल्पाच्या ठिकाणी विकल्प असे म्हणतात आणि पुण्यकर्म करण्याचे जर आवरले तर पुण्य तर लागत नाही उलट पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदा की आमच्या मनामध्ये भक्तीविषयी विकल्प निर्माण जर झाला तर त्यानंतर तुम्ही आम्हाला कितीही प्रेम दिले किंवा जीव लावले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण शिजलेल्या अन्नाला जर पुन्हा अग्नी जाळ दिला तर त्याचा काही उपयोग होत नाही तसाच हा प्रकारही व्यर्थ ठरेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग