श्रमपरिहारा । मूळ झा
2751.
श्रमपरिहारा । मूळ झालो दातारा ॥१॥
देह निवेदूनि पायी । झालो निष्काम उतराई ॥धृपद॥
आपली ते सत्ता । येथे असो नेदी आता ॥२॥
राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा ॥३॥
अर्थ :
हे दातारा श्रमाच्या परिहाराला मीच मूळ झालो आहे. आता हा देहच तुमच्या पायी मी उतरुन टाकला आणि तुमच्या ऋणातून उतराई होऊन निष्काम झालो आहे. या देहावर आता आपली सत्ता मी राहू देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या संसाराच्या खटपटीपासून वेगळा आणि सर्वांपेक्षा निराळा होऊन राहिलो आहे.
