वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

भेटीलागी पंढरिनाथा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077384 · अभंग क्र. २७४६

2746.
भेटीलागी पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥१॥
कधी कृपा करिसी नेणे । मज दीनाचे धावणे ॥धृपद॥
सीणले माझे मन । वाट पाहाता लोचन ॥२॥
तुका म्हणे भूक । तुझे पाहावया मुख ॥३॥

अर्थ :
हे पंढरीनाथा तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला तळमळ व व्यथा लागली आहे. तू माझ्यावर कृपा कधी करशील आणि माझ्यासारख्या दीनाने तुला आवाज दिल्यावर कधी धावत येशील हे मला काही कळत नाही. देवा माझे मन आणि डोळे तुझे वाट पाहून पाहून शीणले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे मुख पाहावे केवळ एवढीच एक भूक मला लागली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग