वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

लागे तुझी सोय करी ऐस

🙏 3. संत तुकाराम · ABH-077407 · अभंग क्र. २७४५

2745.
लागे तुझी सोय करी ऐसे काही । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥
पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥धृ॥
नाही तरी ब्रीद टाकी सोडूनिया । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
बोलियेला बोल करावा साचार । तरी लोक बरे म्हणतील ॥३॥
करावा संसार लोक लाजे भेणे । वचनासी उणे येऊ नेदी ॥४॥
तुम्हा आम्हा तसै नाही म्हणे तुका । होशील तू सखा जीवलग ॥५॥

अर्थ :
हे विठाबाई माऊली माझी आई तुझी प्राप्ती मला होईल असे तू काहीतरी करावे. तू स्वत:ला जर पतित पावन असे म्हणून घेत असशील तर माझा अव्हेर तू करु नकोस. जर तुला माझ्यावर प्रेमच धरायचे नसेल तर तुझे ब्रीद तू सोडून टाक. देवा तू गीतेमध्ये जे काही तुझे वचन बोलला आहेस ते तू खरे करुन दाखव तरच लोक तुला चांगले म्हणतील. कोणत्याही प्रकारचे काम करायचे असेल तर लोकलज्जेने का होईना व्यवहार चांगला करावा त्यामुळे देवा तुझे वचन गीतेमध्ये सांगितले आहे त्याचे तू व्यवस्थित पालन कर त्याला कोणत्याही प्रकारचा उणेपणा येऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू जर माझा जिवलग सखा झाला तर तुम्हीही पतितपावन ठराल आणि मला देखील तुमची प्राप्ती होईल व त्यामुळे आपल्या दोघाना कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग