वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

भागल्यांचा तू विसावा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077296 · अभंग क्र. २७४३

2743.
भागल्यांचा तू विसावा । करी गांवा निंबलोण ॥१॥
परमानंदा पुरुषोत्तमा । हरी या श्रमापासूनि ॥धृपद॥
अनाथांचा अंगीकार । करिता भार न मनिसी ॥२॥
तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥३॥

अर्थ :
हे देवा तू थकलेल्या लोकांचा विसावा आहेस विश्रांतीस्थान आहेस त्यामुळे मी तुझी दृष्ट काढून तुझ्यावरुन लिंबलोण उतरेन. हे परमानंदा पुरुषोत्तमा तू मला या संसाराच्या श्रमापासून सोडव. देवा तू अनाथांचा अंगीकार करतोस त्यांचा कोणत्याही प्रकारचा भार तू मानत नाहीस. हे विठाबाई माझे आई तू सर्वांची इच्छा पूर्ण करु शकतोस असा सर्व समर्थ तू आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग